यशवंत सिन्हा यांना न्यायालयीन कोठडी, Yashwant Sinha to judicial custody

यशवंत सिन्हा यांना न्यायालयीन कोठडी

यशवंत सिन्हा यांना न्यायालयीन कोठडी
www.24taas.com, झी मीडिया, हजारीबाग (झारखंड)

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना स्थानिक न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आज न्यायालयीन कोठडी सुनावली. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आली आहे.

वीज विभागातील सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सिन्हा यांच्यासह इतरांना काल सोमवारी अटक करण्यात आली होती. मारहाण केल्यानंतर जेएसईबीचे व्यवस्थापक धनेश झा यांनी तक्रार दाखल केली होती. न्यायदंडाधिकारी आर. बी. पाल यांनी यशवंत यांना ही शिक्षा सुनावली.

वीजेअभावी विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. शिवाय, नागरिकांना विविध संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे जेएसईबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले, अशी माहिती सिन्हा यांनी दिली.

दरम्यान, सिन्हा यांच्यासह त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरून मारहाण केल्याचा आरोप जेएसईबीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 3, 2014, 16:18


comments powered by Disqus