सोनिया गांधींवर कोळसा भिरकावला, Youth coal thrown on Sonia Gandhi

सोनिया गांधींवर कोळसा भिरकावला

सोनिया गांधींवर कोळसा भिरकावला
www.24taas.com, राजकोट

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी गुजरातमधील राजकोट सभेवेळी कोळसा हल्ल्याला तोंड द्यावे लागले. एका तरूणांने सोनियांच्या दिशेने कोळसा भिरकावला.

गुजरात विधानसभा निवडणुकीचा नारळ फोडण्यासाठी सोनिया गांधी गेल्या होत्या. राजकोटची सभा आटोपून सोनिया गांधी आपल्या ताफ्यासह विमानतळाकडे निघाल्या असता त्यांच्या गाडीवर एका तरुणाने कोळसा फेकला. रेसकोर्स रिंग रोडवरील बालभवनजवळ ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकारानंतर मोरवी येथील रहिवासी हरिओम विजय त्रिवेदी या तरुणाला अटक केली आहे.

सोनिया गांधी यांच्यावर ही नामुष्कीकारक घटना घडल्याने संपात व्यक्त होत आहे. दरम्यान, सोनिया दिल्लीत परतल्यानंतर एका तरुणाला झालेल्या अटकेनंतर कोळसाफेकीची बाब उजेडात आली.

राजकीय नेते केवळ आश्वाेसनांची बकबक करत फिरतात. लोकांना दिलेला शब्द पाळत नाहीत. त्यांच्या या वर्तनाच्या संतापातून आपण सोनिया गांधींवर कोळसा आणि राख भरलेली थैली फेकली, असे त्रिवेदी याने पोलिसांना सांगितले. आपण हळदीची राख करून पिशवीत भरली होती, असेही तो म्हणाला.

First Published: Friday, October 5, 2012, 11:17


comments powered by Disqus