Last Updated: Monday, September 23, 2013, 09:23
www.24taas.com , झी मीडिया, रांचीचॅम्पियन्स लीग टी-२० मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज काल टायटंसला हरवलं, ही बातमी जितकी चर्चेत नव्हती. तेवढी सध्या चर्चा सुरू आहे ती धोनीच्या नव्या हेअर स्टाईलची. धोनीनं आपल्या नव्या रॉक स्टार लूकमध्ये सर्वांसमोर आलाय.
पहिले लांब केस, मग टक्कल आणि आता रॉक स्टार लूक... धोनी नेहमीच आपल्या केसांवर एक्सपेरिमेंट करत असतो. आता सध्या धोनीची नवी हेअर स्टाईल सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आपल्याच शहरात काल खेळत असतांना धोनीचा हा नवा लूक पाहून प्रेक्षकही थक्क झाले.
धोनीचा नवा लूक थोडा वेगळा आहे. आपल्या लांब केसांसाठी ओळखला जाणाऱ्या धोनीच्या डोक्यावरील दोन्ही बाजूचे केस आता गायब झाले आहेत. डोक्याच्या मधोमधच त्यानं केस ठेवले आहेत.
क्रिकेट सोबतच धोनी फूटबॉलचा फॅन आहे. धोनीची ही नवी स्टाईल त्याचं फूटबॉल प्रेमच सांगतंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, September 23, 2013, 09:23