Last Updated: Monday, October 14, 2013, 16:05
www.24taas.com, वृत्तसंस्था, पुणेऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या वनडे मॅचमधील टीम इंडियाच्या पराजयला बॅट्समनच जबाबदार असल्याचं कॅप्टन कूल धोनीनं म्हटलंय. मैदानात जम बसल्यानंतर शॉट्सची निवड करतांना बॅट्समननं सावधगिरी बाळगायला हवी होती, असंही धोनी म्हणाला.
मॅच संपल्यानंतर धोनी म्हणाला, “आम्ही ज्या पद्धतीनं मॅचला सुरूवात केली. मात्र त्याप्रमाणे पुढे पार्टनरशीप करु शकलो नाही, शिवाय शॉट्सची निवडही करण्यात बॅट्समन्सची चूक झाली. एकदा मैदानावर उतरल्यानंतर विकेट वाचवणं गरजेचं होतं. आम्ही असे काही शॉट्स खेळलो की ज्याची गरज नव्हती आणि त्याचाच आम्हाला फटका बसला”. भारतीय टीममध्ये ऑस्ट्रेलियासारखे स्विंग बॉलर्स नाहीयेत त्यामुळं पीचचा फायदाही आम्ही घेऊ शकलो नाही, असं धोनीला वाटतं.
टीम इंडियाच्या स्पिनर्सनं चांगलं प्रदर्शन केलं मात्र आम्ही खूप फालतू रन्स दिले, अशी खंतही धोनीनं बोलून दाखविली. शिवाय दवबिंदू पडण्याकडेही आम्ही लक्ष द्यायला हवंय. मॅचमध्ये एक वेळ अशी आली होती की दोन्ही टीम बरोबरीत होत्या. मात्र अपयश मिळालं. पॉवर प्लेपर्यंत बॅट्समननं योग्य खेळणं गरजेचं होतं, असं धोनी म्हणाला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, October 14, 2013, 16:05