राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजितदादांनाच नडले, गाडी रोखली, Ajitdada car stop

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजितदादांनाच नडले, गाडी रोखली

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजितदादांनाच नडले, गाडी रोखली
www.24taas.com, ठाणे

ठाण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची गाडी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी अडवली. महागाईविरोधात संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित दादांची गाडी अडवली.

विशेष म्हणजे घोडागाडीवरून हे कार्यकर्ते आले होते. सोबत सिलेंडर आणून त्यांनी केंद्र सरकारनं केलेल्या इंधन दरवाढीचा निषेध केला. राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांचा मेळावा हॉटेल सत्कार रेसिडन्सी इथं आहे.

त्याकरता अजितदादा ठाण्यात आलेत. आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचाव्यात यासाठी हा निषेध नोंदवण्यात आल्याचं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

First Published: Friday, September 14, 2012, 15:19


comments powered by Disqus