तिजोरीसाठी गॅसच्या किमतीत वाढ – विरप्पा मोईली, Gas price increase for Government safe - virappa moily

तिजोरीसाठी गॅसच्या किमतीत वाढ – विरप्पा मोईली

तिजोरीसाठी गॅसच्या किमतीत वाढ – विरप्पा मोईली
www.24taas .com,झी मीडिया,बंगळुरु

पेट्रोलियम मंत्री एम वीरप्पा मोइली यांनी गॅसच्या किंमतीत होणाऱ्या वाढीबद्दल बोलताना सांगितले, गॅसचे दर वाढल्याने त्याचा फायदा हा शासनालाच होणार आहे. कारण, गॅसचा शोध शासकीय कंपन्यांनकडूनच अधिक लावल्याचे वीरप्पा मोइली यांनी म्हंटलंय.

गरिबांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार. सामान्य जनतेचा विचार करण्यापलीकडे शासनाची भूमिका असल्याचे दिसून येतेय. पुन्हा होणार गॅसच्या किंमतींमध्ये वाढ आणि प्रशासनाला होणार त्याचा फायदा.

पत्रकारांशी बोलताना माझ्या मते, जवळजवळ ९० टक्के गॅसचा शोध शासकीय तर, उरलेला १० टक्के खासगी कंपन्यांनी लावल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यातून एकूण मिळालेला ८० टक्के फायदा हा कराच्या स्वरुपात सरकारकडे जमा होईल. देशातील या पैशाचा सुरक्षित आणि पुनरवापर चांगल्याच गोष्टींसाठी केला जाईल. त्याला इतर देशांच्या घशात जाऊन देणार नाही.

केंद्रिय मंत्रिमंडळाच्या अर्थविकास समितीने २७ जूनला सर्व घरगूती स्तरावरील गॅसच्या दरात १ एप्रिल २०१४ पासून वाढ करुन ८.४ डॉलर प्रति १० लाख प्रमाणे ब्रिटीश थर्मल युनिट (एमबीटीयू) करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. जे की आता त्याची किंमत ४.२ डॉलर प्रति एमबीटीयू चालू आहे. परंतु आपल्या फायद्याच्या पलिकडे शासनाला गरीब जनतेचे काही पडले नसल्याचेच यातून दिसते.

# इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

# झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, July 6, 2013, 15:25


comments powered by Disqus