गायीचे दूध ४, म्हशीचे ५ रु. महागणार, Milk rate will increase in maharashtra

गायीचे ४ तर म्हशीचे दूध ५ रुपयांनी महाग

गायीचे  ४ तर म्हशीचे दूध ५ रुपयांनी महाग
www.24taas.com, पुणे
खासगी दूध उत्पादकांपाठोपाठ सहकारी दूध उत्पादक संघांनीही दूध दरवाढीचा प्रस्ताव ठेवलाय. गायीच्या दुधात प्रतिलिटर चार रुपयांची तर म्हशीच्या दुधात प्रतिलिटर 5 रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवलाय.

सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संस्थांच्या कृती समितीनं हा प्रस्ताव माडललाय. दुष्काळ, डिझेल दरवाढीमुळं दूध दरवाढ केल्याचं सांगितलय़ं.

यापूर्वी खासगी दूध विकेत्यांनी गायीच्या दुधात प्रतिलीटर ४ रुपयांनी वाढ केली आहे. आता या दरवाढीत सहकारी दूध उत्पादक संघांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मान्य झाल्यास सरकारी दूधही महागणार आहे.

First Published: Thursday, October 4, 2012, 17:08


comments powered by Disqus