सरकार पडणार वाटतं, घटक पक्ष पाठिंबा काढणार?, No support to Government

सरकार पडणार वाटतं, घटक पक्ष पाठिंबा काढणार?

सरकार पडणार वाटतं, घटक पक्ष पाठिंबा काढणार?
www.24taas.com, नवी दिल्ली

इंधन दरवाढ आणि परदेशी गुंतवणुकीबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर, आता युपीए घटक पक्षांमध्ये विरोध वाढीस लागला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी कठोर भाषेत सरकारवर टीकास्त्र सोडत, येत्या दोन दिवसांत निर्णय मागे घ्या, अन्यथा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिलाय. ममतांपाठोपाठ द्रमुकनंही या निर्णयांना विरोध दर्शवत, आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे.

तर युपीए सरकारला बाहेरुन पाठिंबा देणा-या सपा आणि बसपानंही एफडीआयच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय. या सगळ्यांचं लोकसभेतील पक्षीय बलाबल मोठ्या संख्येनं असल्यानं एफडीआयच्या निर्णयावर सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे..

First Published: Saturday, September 15, 2012, 13:30


comments powered by Disqus