Last Updated: Monday, June 17, 2013, 16:19
www.24taas.com, झी मीडिया, वेलिंग्टनभारतात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कारांची संख्या वाढत असताना न्यूझीलंड सारख्या देशात महिला अल्पवयीन मुलांवर करत असलेल्या लैंगिक अत्याचारांची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या अत्याचारांमुळे चक्क ११ वर्षांचा १ मुलगा बाप बनला आहे.
या अकराव्या वर्षी बाप बनलेल्या मुलाच्या मुलाची आई ३६ वर्षांची आहे. ही महिला मुलाच्या मित्राची आई आहे. ही घटना लैंगिक अत्याचाराची मानली जात आहे. या मुलाने आपल्या शाळेतील शिक्षकाला याबद्दल सांगितलं. आपल्याला आपल्या मित्राच्याच आईशी मनाविरुद्ध संबंध ठेवावे लागत असून आपल्याला ते अजिबात मान्य नसल्याचं त्याने सांगितलं.
हे प्रकरण प्रसिद्ध होताच सर्वत्र खळबळ माजली आहे. या संबंधांतून जन्माला आलेलं मुल सध्या सरकारच्या ताब्यात आहे. आता महिलाही अल्पवयीन मुलांवर बलात्कार करतात, याची दखल घेतली जावी यासाठी सर्व थरातून आवाज उठू लागला. न्यूझीलंडमध्ये बलात्कारविषयक कायद्यानुसार पुरूषांनी बलात्कार केल्या २० वर्षं तर महिलेने बलात्कार केल्यास १४ वर्षांची शिक्षा होते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, June 17, 2013, 16:19