24taas.com, 14 shia muslims shot in iraq by ganman

इराकमध्ये १४ शिया मुस्लिमांची हत्या

इराकमध्ये १४ शिया मुस्लिमांची हत्या

www.24taas.com, किरकूक, इराक

इराकच्या उत्तर भागातील किरकूकमध्ये अज्ञान बंदूकधाऱ्यांनी १४ जणांची गोळ्या घालून हत्या केलीय. हे १२ जण मुस्लीम होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळे जातीय हिंसेचे बळी ठरले आहेत.

हा हल्ला अमरेलीच्या शिया तुर्कमान गावानजीक झाल्याची माहिती, तूज खोरमातो शहराचे मेयर शलाल अब्दुल यांनी दिलीय. हल्लेखोर मोटारसायकलवर स्वार होते. घटनास्थळी पोहचताच त्यांनी शिया जातीच्या लोकांना सुन्नी जातीच्या मुस्लिमांपासून दूर केलं. त्यानंतर त्यांनी १४ शिया लोकांवर गोळ्यांचा वर्षाव केला.

अब्दुल यांच्या म्हणण्याप्रमाणे, दहशतवादी या ठिकाणांवर जातीय हिंसा घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केलीय. २००५ ते २००८ या काळात इराकमध्ये होणाऱ्या जातीय हिंसक घटनांमध्ये घट झाली होती पण घातक हल्ले मात्र इथं रोजचेच झालेत.

First Published: Monday, August 13, 2012, 18:01


comments powered by Disqus