पाकमध्ये १८ हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन!,18 hindu turned into Muslims

पाकमध्ये १८ हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन!

पाकमध्ये १८ हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन!
www.24taas.com, वृत्तसंस्था, इस्लामाबाद

पाकिस्तानातील एका हिंदू परिवाराचे धर्मांतर करण्यात आलंय. परिवारातील सर्वच्या सर्व १८ सदस्यांनी आपला धर्म बदलवला आहे. या परिवाराने इस्लाम धर्म स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. धर्मपरिवर्तनाची कारणं समजू शकलेली नाहीत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील खानपूर परिसरात या परिवाराचे वास्तव्य होते.

मिळालेल्या माहितीनुसार झोक फरीद येथील ख्वाजा गुलाम फरीद दर्ग्याचे रक्षक मियां घौस मुहम्मद यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात या परिवारातील ७ पुरूष आणि ११ महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला. या कार्यक्रमाला परिसरातील प्रतिष्ठितांची उपस्थिती होती. परिवार प्रमुखाने मुहम्मद शरीफ असे नामकरण केले आहे.

पाकिस्तानात वरचेवर हिंदुचे जबरदस्ती धर्मांतरण केले जाते. मुस्लिम युवक हिंदू महिलांसोबत विवाह करण्यासाठी महिलांचे अपहरण करतात आणि त्यांचे धर्मपरिवर्तन करण्यात येते.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 3, 2013, 17:28


comments powered by Disqus