Last Updated: Tuesday, April 23, 2013, 11:57
www.24taas.com, बीजिंग चीनच्या स्वतंत्र मंगोलिया भागात ५.३ भूंकपाचे झटके जाणवले. चीनमधील शिचुआना प्रांतात शनिवारी झालेल्या भूकंपात मृतांची संख्या १९२ वर पोहोचली आहे. तर १२ हजारांहून अधिक लोक जखमी असून २३ जणांचा थांगपत्ता लागलेला नाही.
भूकंपात शिचुआना प्रांतातील लूशान जिल्ह्यात घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. भूकंपात आतापर्य़ंत १९२ लोकांचा बळी गेलाय. बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सियाचीनमधील अडचणींवर मात करण्यासाठी चीन प्रशासनाने ठोस पावलं उचलली आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) या वायुसेनेची मदत घेण्यात आली आहे.
भूकंपग्रस्त भागांमध्ये विमानाद्वारे मुलभूत गोष्टींचे वाटप करण्यास सुरूवात केली आहे. स्वतंत्र मंगोलिया भागातील तोंगलियाओ आणि लियाओनिंग भागातील फुक्सिन शहरात सोमवारी भूकपांचे झटके जाणवले.
चीनच्या भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार लुशानपासून २०० किलोमीटर दूर वेनचुआन येथे हादऱ्याचा केंद्रबिंदू होता. हा केंद्रबिंदू जमिनीपासूम ६ किलोमीटर खोल असल्याचे नोंदवण्यात आले असून त्याची तीव्रता ५.३ रिस्टर स्केल इतकी होती.
First Published: Tuesday, April 23, 2013, 11:16