Last Updated: Thursday, April 10, 2014, 16:09
www.24taas.com, झी मीडिया, पिट्सबर्ग अमेरिकेतील पिट्सबर्ग इथल्या पेन्सीलवॅनिया हायस्कूल बुधवारी रक्तरंजित सकाळ पाहायला मिळाली. हायस्कूलमध्ये एका १६ वर्षीय युवकानं २२ विद्यार्थ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर चाकूनं हल्ला चढवला.
वृत्तसंस्था ईएफईच्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यांचं नाव एलेक्स हरिबल आहे. तो याच शाळेत शिकतोय. शाळेत शिरला त्यावेळी त्याच्याकडे दोन चाकू होते. याच चाकूंनी त्यानं विद्यार्थ्यावर आणि कर्मचाऱ्यांवर अचानक हल्ला केला. यामध्ये तब्बल २२ विद्यार्थी आणि एक कर्मचारी जखमी झालाय. या घटनेत हल्लेखोराच्या डोक्यावरही जखमी झालीय.
पोलिसांनी तातडीने युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केलीय. तसेच हल्लेखोराने विद्यार्थ्यांवर हल्ला का केला? याची देखील तपासणी सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी शाळेत विद्यार्थी आले असताना युवकाने अचानकपणे प्राथमिक वर्गातील विद्यार्थांवर हल्ला केला आणि विद्यार्थांना जखमी केलं.
रुग्णालयातील सूत्रांच्या माहिती नूसार, सर्व जखमी विद्यार्थी १४ ते १७ वयाचे असून, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 10, 2014, 14:59