२४ लाख भारतीय आता अमेरिकन नागरिक, 24 lakh indian will be american

२४ लाख भारतीय आता अमेरिकन नागरिक

२४ लाख भारतीय आता अमेरिकन नागरिक
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन

अमेरिकेच्या काही सर्वोच्च नियामक मंडळाने परदेशातून कायमचे वास्तव करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी एक बिल तयार केले आहे. हे विधेयक राष्ट्रध्यक्षाकडून संमत झाले तर २४ लाख भारतीयांसोबत १.१ करोड लोकांना अमेरिकन नागरिकत्व प्राप्त होऊ शकते.

ओबामा यांच्या प्रशासनच्या या विधेयकाला ८८ मतांनी संमती दर्शविण्यात आलीय. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे पाठवण्याआधी सभागृहात प्रतिनिधी या कायद्यासंबधी चर्चा करतील. या विधेयकात एच१ बी व्हिसाच्या संदर्भात काही कडक तरतूदी आहेत. ज्याचा परिणाम अमेरिकेतील भारतीय कंपन्यांवर होऊ शकतो.

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी या विधेयकाबाबत असं म्हटलयं की, या मजबूत मतदानाबरोबरच अमेरिकन सर्वोच्च नियामक मंडळ, अमेरिकन जनता आणि सगळ्यांनाच या डळमळीत झालेल्या स्थलांतरण व्यवस्थेला रोखण्यासाठी संधी मिळणार आहे. या नविन कायद्यामुळे १.१ करोड लोकांसाठी अमेरिकन नागरिकत्व प्राप्तीचा दरवाजा खुला होणार आहे.

हा कायदा स्थलांतरण व्यवस्थेला नक्कीच नवे रुप देऊ शकतो. या कायद्यामुळे आम्हाला आर्थिक तोटाही कमी प्रमाणात होईल तसेच अर्थव्यवस्थेचा विकास होण्यात हातभार लागेल, असे ओबामा यांनी सांगितले.

हे विधेयक जर आणायचे असेल तर सभेत बहुमत मिळणे आवश्यक आहे. सदस्यांच्या बहुमताशिवाय कोणतेही विधेयक पुढे जाऊ शकत नाही, सभागृहचे अध्यक्ष जॉन बोएनर यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 28, 2013, 16:35


comments powered by Disqus