Last Updated: Friday, January 18, 2013, 20:34
www.24taas.com, शिकागोतहव्वूर राणाला शिकागो कोर्टानं १४ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. डेनमार्कमधील दैनिकावर दहशतवादी हल्ल्याच्या कटात सामील असल्याप्रकरणी राणाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिवाय पाकिस्तानातल्या लष्कर-ए-तोयबाला मदत केल्याचा ठपकाही राणावर ठेवण्यात आला आहे.
तहव्वुर राणा हा दहशतवादी डेव्हिड हेडलीचा साथीदार आहे... राणाच्या खराब तब्येतीमुळं त्याला ९ वर्षाची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी त्याच्या वकीलांनी केली होती.. तर अमेरिकन वकीलांनी त्याला ३० वर्षाच्या शिक्षेची मागणी केली होती. २००९ साली राणाला मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
मात्र त्याची या आरोपातून मुक्तता करण्यात आली. मुंबई हल्ल्यात राणा सामील असल्याचा आरोप भारतीय तपासयंत्रणांनी केला असून त्यांची याप्रकरणी दुसऱ्यांदा चौकशीची मागणीही केली आहे.
First Published: Friday, January 18, 2013, 14:22