२६/११ : पाकचं न्यायालयीन पथक भारतात दाखल, 26/11: pakistan judicial commission in india

२६/११ : पाकचं न्यायालयीन पथक भारतात दाखल

२६/११ : पाकचं न्यायालयीन पथक भारतात दाखल
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा खटला पाकिस्तानातही सुरू आहे. याचसंबंधी आणखी काही जबाब नोंदविण्यासाठी पाकिस्तानचं एक न्यायालयीन पथक नुकतंच मुंबईत दाखल झालंय.

पाकिस्तानच्या या पथकात आठ जणांचा समावेश आहे. कसाबचा कबुलीजबाब घेणारे किला कोर्टातील न्यायाधीश, सरकारी बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचाही जबाब हे पाकचं न्यायालयीन पथक नोंदविणार आहे.

सोबतच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा तपास अधिकारी, क्राईम ब्रान्चचे अधिकारी रमेश महाले, कसाबवर उपचार करणारे जे.जे.हॉस्पीटलचे दोन डॉक्टर तसंच कसाब अल्पवयीन नव्हता, हे तपासून सांगणारे डॉक्टर या सर्वांचा जबाब नोंदविण्याची जबाबदारी या पथकावर सोपवण्यात आलीय.

हे जबाब पाकिस्तानात सुरू असलेल्या न्यायालयीन खटल्यासंदर्भात वापरण्यात येणार आहेत. त्यामुळेच अगोदर, कसाब पाकिस्तानी नागरिक नव्हताच, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानच्या या न्यायालयीन पथकाचा हा भारतदौरा अतीमहत्त्वाचा मानला जातोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, September 24, 2013, 13:18


comments powered by Disqus