हेडली, राणाला भारताच्या ताब्यात द्या -खुर्शीद, 26/11 terrorist attack, David Headley, Tahawwur Rana

हेडली, राणाला भारताच्या ताब्यात द्या - खुर्शीद

 हेडली, राणाला भारताच्या ताब्यात द्या - खुर्शीद
www.24taas.com,नवी दिल्ली

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली आणि तहाव्वूर राणा यांना भारताच्या ताब्यात देण्यात यावं, अशी मागणी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी केलीय.

यासंदर्भात त्यांनी अमेरिकन सरकारला पत्रही लिहलंय. भारताच्या या मागणीबाबत लवकरच विचार करण्यात येईल असं अमेरिकेनं स्पष्ट केलय.

२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याला येत्या १७ जानेवारी रोजी तर दिल्या जाणाऱ्या शिक्षेची घोषणा तर तहाव्वूर राणाला फाशीची करण्यात येणार आहे. अमेरिकेतील शिकागो कोर्ट या शिक्षा सुनावणार आहे.

अमेरिकेचा नागरिक असलेला डेव्हिड हेडली लष्कर – ए - तैय्याबाचा दहशतवादी असून मुंबई दहशतवादी हल्ल्यात या दोघांनी सहभाग घेतल्याचा आरोप आहे. हेडलीला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त होतीय. शिकागो येथील जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश हॅरी लेनिनबर हे या शिक्षेची घोषणा करणार आहेत.

कोर्टाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, येत्या १५जानेवारी रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ . ४५ वाजता राणाच्या शिक्षेची घोषणा होईल तर १७ जानेवारी २०१३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ . ४५ वाजता हेडलीच्या शिक्षेची घोषणा होईल.

अमेरिकेचा नागरिक असलेल्या हेडलीनं चौकशीत तपास अधिकाऱ्यांना केलेल्या मदतीमुळे तसंच सर्व आरोप मान्य केल्यानं त्याला फाशीची शिक्षा देण्यात येणार नाही, हे अगोदरच जाहीर करण्यात आलंय. मुंबई हल्ल्यासाठी पाहणी करणे, कटाच्या आखणीत आणि अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणे, दहशतवाद्यांना विशेष मार्गदर्शन करणे तसेच कटात सहभागी असल्याप्रकरणी हेडलीला दोषी ठरवण्यात आले आहे.

First Published: Sunday, December 2, 2012, 12:44


comments powered by Disqus