Last Updated: Monday, May 19, 2014, 17:52
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली नमो नमोचा गजर केवळ देशातच होत नाहीय, तर परदेशात देखील नमो नामाचा गजर होत आहे. नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक विजयोत्सव अमेरिकेतील मोदी समर्थक सलग तीन दिवस साजरा केला.
यावेळी सामुदायिक केंद्र,मंदिर आणि घरांघरामध्ये दीपमाळा लावण्यात आल्या. तसेच भारताबाहेरील भाजपचे समर्थक चंद्रकांत पटेल यांनी सांगितलं की,`नरेंद्र मोदींचा विजय हा भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. या कारणाने आम्ही सर्व अनिवासी भारतीयांनी १६,१७ आणि १८ मे रोजी दिव्यांची रोषणाईत मोदींच्या विजयाचा आनंद साजरा केला. आमच्यासाठी ही मोदींचा विजय हा तर दिवाळीसारखाच एक सण होता.
भारताच्या विविध भागात भाजपच्या प्रचारात स्वखर्चावर अनिवासी भारतीय देखील सहभागी झाले होते. मोदींच्या स्टाईलिश शैलीबद्दल पटेल म्हणाले की, `भारतातील मतदान हे भारतीय मतदारांनी केलेल भ्रष्टाचाराविरुद्ध मतदान आहे. ही तर भारतात नवीन युगाची सुरुवात आहे.’
मोदीच्या समर्थकांनी न्यू यॉर्क, जर्सी सिटी, एडिसन, शिकागो, थंपा, ह्यूस्टन, डल्लास, लॉस एंजिल्स, सॅन फ्राँसिस्को अशा अनेक शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 19, 2014, 17:52