Boston Marathon, Explosions, Running, Racing

अमेरिकेत साखळी बॉम्बस्फोट; ३ ठार १३० जखमी

अमेरिकेत साखळी बॉम्बस्फोट; ३ ठार १३० जखमी
www.24taas.com, बोस्टन

अमेरिकेतल्या बोस्टनवासियांसाठी आजचा दिवस काळा मंगळवार ठरला आहे. शहरात आज झालेल्या ३ स्फोटात ३ जण ठार तर १३० जण जखमी झालेत. बोस्टन मॅरेथॉनदरम्यान दोन स्फोट झाले. तर तिसरा स्फोट जेएफके ग्रंथालयाजवळ झाला. बोस्टन मॅरेथॉन हा अमेरिकेतला महत्तवाचा स्पोर्टस इव्हेंट आहे.

या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मॅरेथॉन फिनिशिंग लाईनच्या जवळच दोन स्फोट झाले आहेत. हा स्फोट झाला त्या ठिकाणावरुन विमान उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहेत.


बोस्टनसह अमेरिकेतल्या सर्वच प्रमुख शहरातील सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. या स्फोटाचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. तसंच कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही.

First Published: Tuesday, April 16, 2013, 07:44


comments powered by Disqus