Last Updated: Wednesday, June 18, 2014, 10:13
www.24taas.com, झी मीडिया, बगदादइराकमध्ये 40 भारतीय कामगारांचे अपहरण करण्यात आले आहेत. मात्र, या अपहरणाची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही.
परराष्ट्रीय मंत्रालयाचे प्रवक्ता सैय्यद अकबरुद्दीन यांनी झी न्यूजला सांगितले की, 40 भारतीयांचा काहीही संपर्क झालेला नाही. भारत इराकच्या अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधून आहे.
या अपहरणामागे इस्लामिक स्टेट इन इराक अॅंड अल-शाम (आयएसआयएस) दहशतवादी गटाचा हात असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, इराकमधील मोसूल शहरातून भारतीयांना बाहेर काढण्यात येत आहे. या शहरावर दहशतवादी संघटनेने कब्जा केलाय.
केंद्र सरकारने आपल्या भारतीय कामगारांना सुरक्षित परतण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. इराकमधील भारतीय माजी राजदूत सुरेश रेड्डी यांना समझोत्यासाठी इराकला पाठविण्यात आले आहे. रेड्डी यांना आसियानचे विशेष दूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपहरण केलेल्या भारतीयांच्या सुरक्षितेबाबत कोणतेही तडजोड केली जाणार नाही, अस स्पष्ट बजावलेय. तशा अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 18, 2014, 10:13