Last Updated: Saturday, October 20, 2012, 15:23
www.24taas.com, नवी दिल्ली19 ऑक्टोबर 1962 या दिवशी चीननं भारतावर आक्रमण केलं त्या घटनेला पन्नास वर्षं पूर्ण झाली आहेत. या युद्धापूर्वी चीनी सरकारने निर्माण केलेलं ‘हिंदी चीनी भाई भाई’, लष्कराकडे झालेलं दुर्लक्ष, यामुळे भारतीय सैन्याची झालेली प्रचंड हानी, या सा-या घटनाक्रमालाही आजच्या दिवशी उजाळा मिळतोय.
त्यातही या युद्धात ठळकपणे आठवतं ते रिझांगला-चुशलू लढाईत शहीद झालेल्या 104 जवानांचं बलिदान... 20 ऑक्टोबरला चीनी सैन्यानं काश्मिर भागात चीनच्या सीमेशी असलेल्या या भागावर हल्ला चढवला आणि या भागाची जबाबदारी असलेल्या 13 कुमांऊ रेजिमेंटनं नेटानं हा हल्ला परतवून लावण्याची पराकाष्ठा केली मात्र कडवा प्रतिकार मिळूनही चिनी सैन्यानं या भागावर कब्जा केलाच.
या लढाईत रेजिमेंटच्या 104 जवानांनी बलिदान दिलं. खरं म्हणजे त्यांच्या कडव्या प्रतिकारामुळेच चिनी सैन्य अधिक घुसखोरी करू शकले नाहीत कारण या लढाईत त्यांचंही अतोनात नुकसान झालं होतं... आणि म्हणूनच आज त्या शहिदांच्या बलिदानाला सलाम करुया...
First Published: Saturday, October 20, 2012, 15:23