‘मंगळ’वारीसाठी ६२ भारतीयांची निवड, 62 Indians shortlisted for one-way trip to Mars

‘मंगळ’वारीसाठी ६२ भारतीयांची निवड

‘मंगळ’वारीसाठी ६२ भारतीयांची निवड
www.24taas.com, झी मीडिया, नेदरलँड
मंगळ ग्रहावर एक कायमची कॉलनी वसविण्याच्या २०२४च्या एका खासगी महत्वाकांक्षी योजनेसाठी जगभरातून १००० व्यक्तींपेक्षा अधिकांची निवड करण्यात आली. या यादीत ६२ भारतीयांचा समावेश आहे.

नेदरलँड नॉन प्रॉफिट संघटना मार्स वन यांच्याकडे २० हजार जणांनी अर्ज पाठविले होते. यातील १०५८ लोकांची निवड करण्यात आली. या सर्व व्यक्ती मंगळावर मानवी जीवनाची सुरू करण्याची इच्छा बाळगतात.

स्पेस डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या यादीत २९७ अमेरिकन, ७५ कॅनडा आणि तिसऱ्या स्थानावर ६२ भारतीय आहेत. ५२ रशियन चौथ्या स्थानावर आहेत. २०१४ आणि २०१५ या कालावधीत विविध टप्प्यांवर या व्यक्तींची निवड केली जाणार आहे. मंगळावर स्थायी कॉलनी बनविण्याचे मार्स वन चे उद्दिष्ट असल्याचे मार्स वनचे मुख्य नारबर्ट क्राफ्ट यांनी सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 3, 2014, 16:20


comments powered by Disqus