Last Updated: Thursday, February 21, 2013, 16:16
www.24taas.com, वॉशिंग्टन अमेरिकेत झालेल्या ताज्या जनगणना अहवालानुसार, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांपैकी आठ टक्क्यांपेक्षा जास्त लोक अमेरिकेतल्या दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत.
अमेरिकेच्या या जनगणनेत सर्व प्रमुख जाती-समूहांच्या लोकांचं प्रती व्यक्ती उत्पन्नही मोजण्यात येतं. ताज्या अहवालामध्ये, आठ टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच जवळजवळ तीस लाख भारतीय अमेरिकन लोकांचा समावेश दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींमध्ये करण्यात आलाय. वर्ष २००७-२०११ च्या अमेरिकन सामूदायिक सर्वेक्षणानुसार (अमेरिकन कम्युनिटी सर्व्हेनुसार) अमेरिकेत ४.२७ करोड लोकांचं उत्पन्न दारिद्र्य रेषेखाली आढळंलय तर राष्ट्रीय दारिद्र्य दर आहे १४.७ टक्के.
जनगणना ब्युरोच्या (सेन्सस ब्युरो) अहवालानुसार दारिद्र्य दरात ८.२ टक्क्यांसहीत भारतीय अमेरिकन इतर जातींच्या समूहाच्या तुलनेत कमी गरिब ठरलेत.
जपानी अमेरिकन लोकांचाही दारिद्र्य दर ८.२ टक्के आहे. आशियाई जनसंख्येत व्हिएतनाम आणि कोरियन लोकांचा दारिद्र्य दर अनुक्रमे १४.७ टक्के आणि १५.० टक्के आहे. तर फिलीपीन अमेरिकन नागरिकांचा दारिद्र्य दर सगळ्यात कमी म्हणजेच ५.८ ट्क्के आहे. व्हिएतनाम आणि कोरियन लोकांची टक्केवारी वेगळी असली तर सांख्यिकीदृष्ट्या हा आकडा वेगळा नाही.
First Published: Thursday, February 21, 2013, 16:15