९० वर्षीय म्हाताऱ्याने केले १५ वर्षीय मुलीशी लग्न!, 90-year-old`s marriage to teenage girl

९० वर्षीय म्हाताऱ्याने केले १५ वर्षीय मुलीशी लग्न!

९० वर्षीय म्हाताऱ्याने केले १५ वर्षीय मुलीशी लग्न!
www.24taas.com, दुबई
साऊदी अरबमधील ९० वर्षांच्या एका आजोबांनी आपल्या नातीच्या वयाच्या म्हणजे १५ वर्षाच्या मुलीशी पैशाच्या जोरावर लग्न करण्याची घटना घडली आहे. हे लग्न मुलीच्या मनाविरुद्ध झाल्यामुळे मानवाधिकार कार्यकर्त्यांनी आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या व्यक्तांनी यावर सडकून टीका केली आहे.

या लग्नाने घाबरलेल्या मुलीने आपल्या वृद्ध पतीला दोन दिवस आपल्या खोलीत येऊ दिले नाही. त्यानंतर ती आपल्या आई-वडिलांच्या घरी गेल्याचे वृत्त अल-अरबिया या वृत्तपत्राने दिले आहे.

या संदर्भात ९० वर्षाच्या जख्खड पतिराजांचे म्हणणे आहे की, हे लग्न वैध आहे. या मुलीशी लग्न करण्यासाठी १७५०० डॉलरचा ‘मेहर’ म्हणजे लग्नाची किंमत दिली आहे. या मुलीचे वडील यमनी आणि आई साऊदी आहे.

मुलीने परत आपल्याकडे यावे, नाही तर दिलेली रक्कम परत करावी, असे केले नाही तर मुलीच्या आई-वडिलांविरोधात केस दाखल करण्याची धमकी या वृद्ध पतीने दिली आहे.

या लग्नाबद्दल अनेकांनी टीका केली आहे. अशा प्रकारे वृद्ध व्यक्तीशी लग्न लावल्याबद्दल ट्विटरवर अनेकांनी मुलीच्या आई-वडिलांची निंदा केली आहे. या संदर्भात साउदी राष्ट्रीय मानवाधिकार संघाचे सदस्य सुहैला जीन अल-आबेदीन यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी विनंती केली की, या संदर्भात मुलीचे आयुष्य खराब होऊ नये यासाठी या वादात हस्तक्षेप करावा.

इस्लामनुसार लग्न हे दोघांच्या सहमतीने व्हायला हवे. मुलीने दोन दिवस खोली बंद ठेवली त्यावरून मुलीची या लग्नाला सहमती नसल्याचे स्पष्ट होते.

First Published: Monday, January 7, 2013, 16:58


comments powered by Disqus