ऐका हे खरंय! अर्जेंटीनामध्ये गरोदर पुरुषानं दिला मुलीला जन्मA Man gave birth to baby girl in Argenti

ऐका हे खरंय! अर्जेंटीनामध्ये गरोदर पुरुषानं दिला मुलीला जन्म

ऐका हे खरंय! अर्जेंटीनामध्ये गरोदर पुरुषानं दिला मुलीला जन्म
www.24taas.com, वृत्तसंस्था, अर्जेंटीना

आपल्याला ऐकून थोडंसं विचित्र वाटेल पण, हे पूर्णपणे खरं आहे... अर्जेंटीनाच्या एन्त्रे रायत परिसरात एका महिलेनं नाही तर पुरुषानं गोंडस अशा मुलीला जन्म दिलाय.

एन्त्रे रायसमध्ये राहणारा २६ वर्षीय एलेक्सिस टॅबोरडा या पुरुषानं एका मुलीला जन्म दिला. टॅबोरडा विवाहित आहे. त्याच्या पत्नीचं नाव करेन ब्रुसेलेरियो आहे. मुलीच्या जन्मानं ती सुद्धा अतिशय खूश आहे.

यामागचं कारण म्हणजे २०१२मध्ये अर्जेंटीनात लिंग बदलवून लग्न करण्याचा कायदा पास करण्यात आलाय. हा कायदा पास झाल्यानंतर एलेक्सिस आणि २८ वर्षीय करेननं सेक्स चेंज शस्त्रक्रिया करुन विवाह केला आणि त्यानुसारच एलेक्सिसनं मुलीला जन्म दिला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 8, 2014, 11:49


comments powered by Disqus