Last Updated: Thursday, December 12, 2013, 18:49
www.24taas.com, झी मीडिया, बार्सिलोना एका लग्नासाठी ५० करोडोंचा खर्च...? अशक्य कोटीतली ही गोष्ट खरी आहे... हे लग्न जगातील दुसऱ्या क्रमांकाचं ‘खर्चिक’ लग्न ठरलंय. हे लग्न होतं सर्वात श्रीमंत उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांची भाची सृष्टी मित्तल हीचं... हे लग्न स्पेनमध्ये बार्सिलोना या शहरात पार पडलं. या लग्नामध्ये ५०३ करोडोरुपयांपेक्षाही जास्त खर्च करण्यात आलाय.
या लग्नासाठी जणू काही बार्सिलोना शहर थोड्या कालावधीसाठी थांबून गेलं होतं. सृष्टी मित्तल ही लक्ष्मी मित्तल यांच्या लहान भावाची प्रमोद मित्तल यांची मुलगी आहे. स्पेनच्या एका वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, हे लग्न जगातील पाच खर्चिक लग्नांपैकी एक ठरलंय... इतकंच नव्हे, तर हे लग्न जगातील दुसऱ्या क्रमांकाचं खर्चिक लग्न ठरलंय. १९८१ मध्ये आबुधाबीचे राजकुमार मोहम्मद बिन जाएद अल नाहयान आणि राजकुमारी सलमा यांच्या लग्नात तब्बल ६०४ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता... त्यानंतर आता मित्तल परिवारतल्या या लग्नाला सर्वात खर्चिक लग्न म्हणून, ‘फोर्ब्स’नं या लग्नाची दखल घेतलीय. या लग्नाची मित्तल परिवाराने पूर्ण मजा घेतली परंतु बार्सिलोनामधल्या लोकांना या लग्नामुळे खूप त्रास सहान करावा लागला. या लग्नामुळे ठिकठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला होता.
लग्नाच्या काही आठवणी म्हणून फोटो काढण्यासाठी चक्क एक हेलिकॉप्टर ठेवण्यात आले होते. ते या लग्नाचे छायाचित्र आकाशातून काढत होते. ६० किलोचा केक, फुगे, फुलांनी सजवलेले दरवाजे आणि लखलख करणाऱ्या लाईटस् या गोष्टी लोकांसाठी आकर्षणाची बाब बनली होती. या लग्नाचे अनेक कार्यक्रम स्पेनच्या ऐतिहासिक स्थळांवर पार पाडण्यात आले. स्पेन टूरिझम बोर्डनं या लग्नाचं आयोजनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती.
याआधीही, २००२ साली लक्ष्मी निवास मित्तल यांच्या मुलाच्या लग्नात केवळ कोलकत्त्याचं ‘व्हिक्टोरिया मेमोरियल’ भाड्यानं घेण्यासाठी या कुटुंबानं नऊ लाख रुपये मोजले होते. तर सन २००४ मध्ये त्यांची मुलगी वनिषा हिचं लग्न भारतीय अरबपति अमित भाटिया याच्याबरोबर करण्यात आलं होतं... त्यावेळी या लग्नासाठी २४० कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 12, 2013, 18:25