दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम पाकनं बंद करावं- पंतप्रधान PM calls for shutdown of `terror machinery` on Pak soil

दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम पाकनं बंद करावं- पंतप्रधान

दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम पाकनं बंद करावं- पंतप्रधान
www.24taas.com, झी मीडिया, संयुक्त राष्ट्र

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत गरजलेत. यावेळी त्यांनी पाकला खडेबोल सुनावले. पाकिस्तान हे दहशतवादाचं केंद्र असून दहशतवादाला खतपाणी घालण्याचं पाकनं बंद करावं, अशी स्पष्ट भूमिका घेतली.

विकासात दहशतवाद ही मुख्य अडचण असल्याचं ते म्हणाले. युनोच्या सुरक्षा परीषदेत विकसनशील देशांनाही स्थान असावं, तसंच विकसीत आणि विकसनशील देशांनी एकत्र येण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मागणीला नकार देत, काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार सोडवला जाण्यास पंतप्रधानांनी नकार दिलाय. शिमला करारानुसारच ही समस्या सोडविली जावी, असं पंतप्रधान म्हणाले.

शरीफ यांनी काल आमसभेत हा मुद्दा उचलत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी मागणी केली होती.

दरम्यान, आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेणार आहेत. शरीफ यांच्याबरोबर त्यांची ही पहिलीच भेट असेल. पाकिस्तानातून नियंत्रीत होत असलेल्या दहशतवादाला लगाम घालून भारतातील दहशतवादी कारवाया बंद करण्याविषयी डॉ. मनमोहनसिंग शरीफ यांच्याशी चर्चा करणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, September 29, 2013, 09:19


comments powered by Disqus