`एअरबस`ने तयार केले विजेवर चालणारे विमान AIRBUS new plane run by electricity

`एअरबस`ने तयार केले विजेवर चालणारे विमान

 `एअरबस`ने तयार केले विजेवर चालणारे विमान
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

विज्ञान युगात नवीन शोध लागणं हे आता काही नवीन नाही. आता तर चक्क जेट विमानच विजेच्या सहाय्याने उडणार आहे. हायब्रिड इलेक्ट्रिक इंजिनाच्या सहाय्याने हे विमान उडणार आहे. फ्रान्सची एअरबस कंपनी या प्रकारचे विमान बनवणार आहे.

या विमानात ७० ते ९० लोकं प्रवास करू शकणार आहेत. एअरबस समुहाचे मुख्य तंत्रज्ञ अधिकारी जीन बोट्टी यांनी सांगितलं की, "विजेवर चालणारे हे विमान येणाऱ्या १५-२० वर्षात कार्यरत होणार आहे." काही दिवसांपूर्वी अशा प्रकारच्या विमानाच ९.५ मीटर लांब असा प्रयोग करण्यात आला होता.

प्रयोग करण्यात आलेल्या विमानाला `ई-फॅन` म्हटलं गेलं होत. हे विमान दोन सीटचं इलेक्ट्रिक मोटरवर चालणारं होतं. हे विमान ताशी १७७ प्रती किलोमीटर वेगाने हवेत उडू शकते.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 29, 2014, 19:34


comments powered by Disqus