कसाबला फाशी : पाकिस्तानी मीडियानं भूमिका घेणं टाळलं , Ajmal Kasab hanged: What Pakistani media is saying

कसाबला फाशी : पाकिस्तानी मीडियानं भूमिका घेणं टाळलं

कसाबला फाशी : पाकिस्तानी मीडियानं भूमिका घेणं टाळलं
www.24taas.com, इस्लामाबाद

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोप अजमल कसाब याला फासावर चढवल्याच्या बातमीवर पाकिस्तानी मीडियानं सावध भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. भारतात उघडउघडपणे कसाबच्या फासावर जाण्याच्या बातमीवर आनंद व्यक्त केला जातोय तिथं पाकिस्तानी मीडियानं मात्र कोणतीही भूमिका घेण्याचं सपशेल टाळलंय.

‘२६/११ च्या हल्ल्यातील बंदूकधारी अजमल कसाब याला फाशी’ अशा मथळ्यांखाली पाकिस्तानी ही बातमी दिलीय. पाकिस्तानातील आघाडीचं न्यूज चॅनल ‘जिओ टीव्ही’नं आपल्या वेबसाईटवर दिलेल्या बातमीत म्हटलंय... ‘भारतानं एकमेव जिवंत हल्लेखोर आणि बंदूकधारी अजमल कसाब याला फाशी दिलीय. २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हात असलेल्याच्या आरोपावरून मोहम्मद अजमल आमिर कसाब याला आज गुप्तरित्या फासावर चढवण्यात आलं’

तर, पाकिस्तानातील आणखी एक आघाडीचं वृत्तपत्र डॉन न्यूजनं आपल्या वेबसाईट dawn.com वर ‘अजमल कसाबला फाशी – भारतीय मीडिया’ असं म्हणत भारतीय मीडियाचा हवाल देतच हे वृत्त प्रसिद्ध केलंय. ‘भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबच्या दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याला बुधवारी सकाळीच फाशी दिली गेली’ असं डॉन न्यूजनं आपल्या बातमीत म्हटलंय. तर ‘द न्यूज इंटरनॅशनल’नं, अजमल कसाब मरेपर्यंत फासावर अशा मथळ्याखाली ही बातमी दिलीय.

‘द नेशन’नं या बातमीला मुख्य पानावर स्थान न देता म्हलंय, ‘२००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील एकमेव जीवंत आरोपी बंदूकधारी अजमल कसाब याला घटनेनंतर जवळजवळ ४ वर्षांनी भारतानं फासावर चढवलंय. भारताच्या आर्थिक राजधानीत तीन दिवस सुरू असलेल्या या हल्ल्यात १६६ जण मृत्यूमुखी पडले हेते’. ‘टाईम्स’नंही आपल्या वेबसाईटवर या बातमीला जास्त महत्त्व दिलेलं नाही. पाकिस्तानचा सरकारी मीडिया असलेल्या ‘पीटीव्ही’च्या वेबसाईटनंही कसाबच्या फाशीची बातमी जास्त फुटेज न देता दिलीय.

First Published: Wednesday, November 21, 2012, 11:53


comments powered by Disqus