Last Updated: Friday, January 31, 2014, 21:46
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईजगात दहशत निर्माण करण्यासाठी, प्रसंगी सुरक्षेसाठी वापरली जाणारी एके-४७ बनवणारे मिखाइल कलाशनिकोफ यांनी लिहलेलं पत्र मिळालं आहे.
हे पत्र त्यांनी रशियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चला लिहिलं होतं.
या पत्रात एके ४७ ने होणाऱ्या हत्यांवर त्यांनी आपलं मनातलं दु:ख व्यक्त केलं आहे. हे पत्र त्यांनी मे २०१२ मध्ये लिहलं आहे.
डिसेंबर २०१३ मध्ये ९४ वर्षांच्या कलाशनिकोफ यांचा मृत्यू झाला होता.
एके ४७ बनवणाऱ्याचं पत्ररशियाचं दैनिक इजवेस्तियाने हे पत्र छापलं आहे. कलाशनिकोफ यांनी पत्रात म्हटलं आहे.
"माझ्या आतलं दु:ख असह्य आहे. माझ्या पुढे तेच न सुटलेले प्रश्न आहेत, जर माझ्या रायफलमुळे लोकांचा जीव गेला आहे, तर मी एक, खिश्चन आणि रूढीवादी असल्याने मी विश्वास करतो की, मी याला जबाबदार आहे".
"मी दीर्घायुष्यी आहे, तेवढाच हा प्रश्न डोक्यात आणखी खोल घोंगावत असतो, आणि समजू शकत नाही, की ईश्वराने माणसाला इच्छा, लोभ आणि रागाची भावना का दिली?"
हे पत्र कलाशनिकोफने आपल्या लेटर हेडवर लिहलं आहे. थरथरत्या हाताने हस्ताक्षर करतांना कलाशनिकोफने लिहलं आहे, `ईश्वराचा दास, डिझायनर, मिखाइल कलाशनिकोफ`.
विविध देशांची ध्येय आणि धोरणं जबाबदारजगात १० कोट्यवधी एके ४७ रायफल विकल्या गेल्या आहेत, असं म्हटलं जात असलं तरी हा आकडा अजून निश्चित नाही. रायफल बनवणारे मिखाइल कलाशनिकोफ यांनी जगातील विविध देशांची ध्येय आणि धोरणं यासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
या हत्यारामुळे होणाऱ्या मृत्युंची जबाबदारी २००८ मध्ये कलाशनिकोफ घ्यायला तयार नव्हते, मात्र २०१३ साली चर्चला लिहिलेल्या पत्रात त्यांनी भावनिक होऊन, आपणच जबाबदार असल्याचं म्हटलं होतं.
मात्र आरोपींच्या हातात जेव्हा एके ४७ रायफल येते तेव्हा रायफल बनवणाऱ्याच्या गर्वाचं हरण होतं. कलाशनिकोफ यांनी २००८ मध्ये म्हटलं होतं, "जेव्हा आरोपींच्या हत्यारातून गोळी चालवतात, तेव्हा मला प्रचंड दुख होतं."
कलाशनिकोफ यांना रशियन सरकारने ऑर्डर ऑफ लेनीन आणि हिरो ऑफ द सोशलिस्ट लेबर पुरस्कारानं गौरवलं आहे.
कलाशनिकोफ यांनी बनवलेलं एके ४७ जगातील सर्वात जास्त वापरलं जाणारं हत्यार आहे. याचं साधारण डिझायन स्वस्त आणि टीकाऊ आणि वापरण्यास सोप आणि ठेवण्यासही सुलभ आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, January 31, 2014, 21:45