Last Updated: Sunday, July 14, 2013, 22:05
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टनध्वनिशास्त्रातला प्रयोगशील जादूगार आणि आवाजाच्या दुनियेतील दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या अमर बोस यांचं अमेरिकेत निधन झालं. ते 83 वर्षांचे होते.
बोस यांच्या नावाने प्रसिद्ध असलेली श्रवण उपकरणे आणि ध्वनिवर्धकांनी प्रेक्षागृह, मोटारी आणि घरातील वापरायच्या ध्वनी उपकरणांच्या मदतीनं संगीत ऐकण्याचा अनुभव अतिशय तरल आणि आनंददायी केला. बोस यांनी पन्नास वर्षांपूर्वी बोस कार्पोरेशनची स्थापना केली होती. ध्वनी उपकरणात अधिक दर्जेदार तंत्रज्ञान आणण्यासाठी त्यांनी संशोधन आणि अभिनव कल्पना राबवल्या होत्या. ध्वनी अभियांत्रिकीत अधिक अभिनव तंत्रज्ञान आणण्याचे प्रयत्न त्यांनी कंपनीच्या माध्यमातून केले.
त्यांचे स्पिकर्स फार महाग होते हे खरे असले, तरी त्यातून संगीत मैफलीचा नितळ आनंद घरबसल्या घेता येत असे. ज्यात अनावश्यक ध्वनि येत नाही असे हेडफोन, मोटारींचे सस्पेन्सन सिस्टीम त्यांनी तयार केल्या.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, July 14, 2013, 22:05