Last Updated: Sunday, December 22, 2013, 16:47
www.24taas.com, वृत्तसंस्था, यूएसजसजसे सणांचे दिवस येतात... तसे गिफ्ट कुरिअरनं वेळेत पोहोचतील की नाही यांची चिंता लागलेली असते. पण आता यूएस पोस्टल आणि फेडेक्स पोस्टल सर्व्हिस हे कुरिअर सुट्टीच्या दिवशीही तुमच्या घरी पोहोचवणार आहेत. त्यासाठी एक वेगळा प्रयोग त्यांनी केलाय...
अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझॉस यांचा प्रयोग यशस्वी झाल्यास तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत फार कमी कालावधीत पोहोचेल. या प्रयोगात एक ऑक्टोकोप्टर जीपीएसच्या सहाय्यानं पत्त्यावर पार्सल सोडेल... पत्त्याच्या ठिकाणी पोहोचताच पार्सल खाली ड्रॉप करेल. पार्सल उचलायला या यंत्राला आठ ब्लेड्स आहेत, अशी माहिती बेझॉस यांनी दिली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.कसं आहे हे यंत्र: पाहा व्हिडिओ
First Published: Sunday, December 22, 2013, 16:47