भारतातील अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांचा राजीनामा Ambassador of America in India Nancy Powel

भारतातील अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांचा राजीनामा

भारतातील अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांचा राजीनामा
www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

देशात लोकसभा निवडणुकीदरम्यान अमेरिकेच्या भारतातल्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. युपीएतल्या परराष्ट्र व्यवहार धोरणकर्त्यांशी जवळीक असल्यानं पॉवेल यांना अमेरिकेत तातडीनं माघारी बोलावून घेण्यात आल्याचं बोललं जातंय.

भारतातल्या निवडणूक निकालांकडे अमेरिकेचेलक्ष लागलंय. निवडणुकीनंतर भारतामध्ये मोदींचं सरकार सत्तेत येईल असं, गृहीत धरून बराक ओबामा प्रशासनानं पॉवेल यांना माघारी बोलावण्याचे संकेत दिले हते. त्यानंतर पॉवेल यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनाना दिल्याचं स्पष्ट केलं.

पॉवेल यांचे मोदींशी असणारे खराब संबंध आणि युपीएला अनुकूल भूमिकेमुळेच त्यांची गच्छंती झाली असल्याचं बोललं जातंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 1, 2014, 10:45


comments powered by Disqus