याला काय म्हणायचं, मुलगी रडली...त्यांनी काढली विकायला, American couple face jail after selling their baby daughter

याला काय म्हणायचं, मुलगी रडली...त्यांनी काढली विकायला

याला काय म्हणायचं, मुलगी रडली...त्यांनी काढली विकायला
www.24taas.com, वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

आपलं बाळ कितीही हट्टी असलं किंवा रडलं तरी कोणी ते विकायला काढेल का? नाही ना! परंतु ही वास्तव घटना घडलेय प्रगत अशा अमेरिकेत. अमेरिकेत एक धक्कादायक बाब पुढे आली आहे, बाळ रडलं म्हणून त्याला चक्क विकायला काढलं.

न्यूयॉर्कमधील विझारे परिसरात राहण्ऱ्या एका दाम्पत्यांन आपली तीन महिन्यांची मुलगी खूप रडते. त्यामुळे या दाम्पत्याची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे या रडणाऱ्य मुलीला ४३० डॉलर्सना विकायला काढली आहे.

इंटरनेटच्या मायाजाळात अनेक वेबसाईट्स आहे. कोणतीही वस्तू झटपट विकून देण्यासाठी काही वेबसाईट्सचा हातखंडा आहे. यापैकी एका वेबसाईटची निवड करून या दाम्पत्याने मुलगी विकण्याबाबत जाहीरातच देऊन टाकली. त्यामुळे तिच्या या आई-बाबांना काय म्हणायचे?

या वेबसाईटवर निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक बाळ दिसत होती. त्या फोटोखाली ओळी होत्या, ही मुलगी खूप रडते. आम्हाला झोपू देत नाही. त्यामुळे आम्ही ती विकायला निघालो आहोत. ही जाहिरात बालसुरक्षा दलाच्या पोलिसांनीही पाहिली आणि चौकशीची चक्रे फिरली. दुसऱ्याच दिवशी दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, जाहिरातीबाबतचे नियम या अजब दाम्पत्यांनी पूर्ण न केल्याने ही जाहिरात तात्काळ त्या वेबसाईटने आपल्या पोर्टवरून काढून टाकली. तर चीनमध्येही अशीच घटना उघडकीस आली. आयफोन घेण्यासाठी आपल्या बाळाला एका दाम्पत्याने विकले. आणि महागडा मोबाईल घेतला. या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 19, 2013, 08:40


comments powered by Disqus