एसी हॅल्मेट डोक्याला ठेवणार `ठंडा ठंडा, कूल कूल` American researchers invent new AC halmet

एसी हॅल्मेट डोक्याला ठेवणार `ठंडा ठंडा, कूल कूल`

एसी हॅल्मेट डोक्याला ठेवणार `ठंडा ठंडा, कूल कूल`
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन

अमेरिकेच्या संशोधकांनी एक विशेष प्रकारचे हॅल्मेट शोधून काढलं आहे. या हॅल्मेटचं वैशिष्ट म्हणजे यात एसी लावण्यात आलेला आहे. याचं दुसरं वैशिष्ट म्हणजे या हॅल्मेटमध्ये बॉम्ब हल्लाही सहन करण्याची क्षमता आहे.

अमेरिकेच्या लष्करी संशोधक केंद्राने या हॅल्मेटची निर्मिती केली आहे. सैन्याला रणरणत्या उन्हात आराम मिळावा यासाठीच संशोधक केंद्राने या हॅल्मेटची निर्मिती केल्याचे सांगितले जातंय. हे हेल्मेट घातल्यानंतर काही वेळाने डोक्याला थंड हवा लागून शांत वाटू लागते. या हॅल्मेटच्या वापरासाठी बॅटरी वापरण्यात आली आहे.

हे हॅल्मेट वजनाने कमी असून, कुठेही सहज वापरण्यासारखे आहे. आण्विक हल्ला आणि किरणोत्सर्गपासून हे हॅल्मेट सैन्याचे संरक्षण करू शकते. अशा प्रकारच्या हॅल्मेटने सैनिकांना नक्कीच संरक्षण मिळेल, असा दावा अमेरिकेच्या लष्करी संशोधक केंद्राने केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 21, 2014, 19:49


comments powered by Disqus