फक्त काही लाखांत अंतराळात जाण्याची संधी!, Antaralata only a few lakhs to break!

फक्त काही लाखांत अंतराळात जाण्याची संधी!

फक्त काही लाखांत अंतराळात जाण्याची संधी!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

अंतराळात जावून पृथ्वीचं आणि तारांगणाचं दृश्य बघण्याची हौस प्रत्येकालाच असते. मात्र केवळ काही नशीबवान लोकांनाच अशी संधी मिळत असते. चीनमधील एका ट्रॅव्हल कंपनीनं मात्र इथल्या सर्व नागरिकांसाठी अशी संधी उपलब्ध करून देण्याचं ठरवलंय.

इथल्या पर्यटकांना अंतराळ सहलीवर जाण्याची संधी देणाची एक अनोखी योजना सुरू करण्याचा विचार ही कंपनी करत आहे. यासाठी या ट्रॅव्हल कंपनीनं नेदरलँडच्या अंतराळ पर्यटन संस्थेसोबत एक करार केला असून २०१४च्या अखेरपर्यंत अंतराळ सहलींना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

चीनमधील `डेक्सो ट्रॅव्हल्स` या आघाडीच्या पर्यटन कंपनीनं इथल्या नागरिकांना अंतराळ सफारीवर नेण्याच्या अनोख्या योजनेचा आराखडा तयार केला आहे. या योजनेअंतर्गत इथल्या नागरिकांना `लिंक्स मार्क वन` या अंतराळयानाद्वारं अवकाशात नेलं जाणार आहे. एक तासाच्या कालावधीत पृथ्वीपासून जवळपास ६० किलोमीटर उंचीवर नेल्यानंतर तब्बल २० मिनिटं अंतराळ सफारी करण्याची संधी पर्यटकांना या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे.

केवळ पायलट आणि एक प्रवासी या दोघांसाठीच असलेल्या या अंतराळ यानातून पर्यटकाला पृथ्वी आणि इतर ग्रहांचं विहंगम दृश्य बघता येणार आहे. मात्र यासाठी पर्यटकाला खिसा चांगलाच रिकामा करावा लागणार आहे. कारण या एका अंतराळ सफारीसाठी पर्यटकाला तब्बल ९५ हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास साठ लाख रुपये खर्च करावे लागणार आहे. २०१४च्या अखेरपासून ही योजना सुरू केली जाईल, असं डेक्सो ट्रॅव्हल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी झँग याँग यांनी सांगितलं. तर २०१५ पासून पर्यटकांना पृथ्वीपासून तब्बल १०३ किलोमीटर उंचीवर नेलं जाईल असंही त्यांनी सांगितलं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 29, 2013, 17:26


comments powered by Disqus