Last Updated: Friday, February 15, 2013, 12:39
www.24taaas.com, न्यूयॉर्क अवकाशप्रेमींना आज आकाशात एक अनोखं दृश्यं पाहण्याची संधी मिळणार आहे. कारण, आज रात्री आकाशातून एक लघूग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाताना तुम्हालाही दिसू शकणार आहे. हा अॅस्टेरॉईड पश्चिम युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या जवळून जाणार आहे. पण, यामुळे पृथ्वीला कोणताही धोका नाही किंबहूना या लघुग्रहाचा काहीही परिणाम पृथ्वीवर होणार नाही, असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलंय.
‘२०१२ डीए १४’ हा उपग्रह शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. हा ग्रह पृथ्वीपासून २७ हजार किलोमीटर अंतरावरून जाणार असून पहिल्यांदाच एखादा ग्रह पृथ्वीच्या इतक्या जवळून जाणार आहे. चांदण्यांच्या पाठिमागून चालणाऱ्या प्रकाशाप्रमाणे हा ग्रह यावेळी भासेल. ७.८ किलोमीटर प्रती सेकंद अशा वेगानं हा प्रकाश धावताना दिसेल. इतिहासात पहिल्यांदाच एखादा ग्रह पृथ्वीच्या इतक्या जवळून जाताना दिसणार आहे.
४५ मीटरचा व्यास असलेल्या या ग्रहाचा शोध मागच्या वर्षी दक्षिण स्पेनच्या काही खगोलशास्त्रज्ञांनी लावला होता. याचा आकार एका फुटबॉल मैदानापेक्षा जवळजवळ साडेतीन पट आहे.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार ‘हवामानाची माहिती देणाऱ्या अवकाशातील उपग्रहांपेक्षाही कमी अंतरावरून हा ग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. मात्र, या आशिया, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियामधील अवकाशप्रेमींना दुर्बिणीच्या सहाय्याने हा ग्रह बघता येणार आहे.
First Published: Friday, February 15, 2013, 11:40