सीरिया हल्ल्याचा तेलाच्या किमतींना फटका , attack on Syria, Oil price increase

सीरिया हल्ल्याचा तेलाच्या किमतींना फटका

सीरिया हल्ल्याचा तेलाच्या किमतींना फटका
www.24taas.com , झी मीडिया, बेरूत

सीरियावर मिलिटरी अॅक्शनसाठी पश्चिमेतल्या महासत्ता एकवटत असल्याचा फटका तेलांच्या किंमतींना बसलाय. एशियन मार्केट्समध्ये या आठवड्यातले सर्वात जास्त भाववाढ तेलाच्या किंमतीत पाहायला मिळालीय.

प्रति बॅरल ११०.२७ डॉलरपर्यंत कच्चा तेलांच्या किंमती पोहोचल्या आहेत. सीरियावर होत असलेल्या कारवाईचा फटका तेलांच्या किंमतींना बसणार हे नक्की आहे. त्यातच इजिप्तमध्येही राजकीय वातावरण चांगलं नाही. त्यामुळे येत्या काळात भारतातही इंधनांच्या किंमतींचा भडका उडणार हे नक्की.

सीरियातील विद्रोही संघटनांच्या मते सीरियावर मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे. ही माहिती अमेरिका आणि सहयोगी देशांच्या दूतांनी दिल्याचं या संघटनेनं सांगितलय. तर सीरियात झालेल्या केमिकल हल्ल्याचा तपास करत असलेल्या यूएनच्या टीमच्या सुरक्षेच्या कारणामुळे हा तपासही थांबवण्यात आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 28, 2013, 13:41


comments powered by Disqus