Last Updated: Saturday, May 11, 2013, 21:32
www.24taas.com, झी मीडिया, लंडन गांधीजीच्या तीन बुद्धीमान माकडांचा लंडनमध्ये लवकरच लिलाव होणार आहे. लंडनमधील लिलाव घर मल्लोक्स येथे २१ मे ला हा लिलाव पार पडणार आहे.
या लिलावात गांधीजींच्या तीन माकडांसोबत त्यांची प्रार्थनेची माळ, पाणी प्यायचा पेला, चप्पल, त्यांनी स्वत:च्या हाताने सुतापासून बनवलेली शाल,काटा चमचा, साधा चमचा आणि हत्तीचा दात यासोबत गांधीजींचे मृत्यूपत्र आणि त्यांची पॉवर ऑख पॅटर्नी आदी गोष्टींचाही लिलाव करण्यात येणार आहे. लिलावघर मलोस्काने केलेल्या वक्तव्यात त्यांनी सांगितलं की, ‘स्टार लॉट’मधील महात्मा गांधींच्या जीवनावश्यक वस्तूंच्या अनेक लिलावांपैकी हा सर्वात महत्वाचा आणि मोठा लिलाव असेल.’
गांधीजींच्या वस्तूंशिवाय मलोस्कामध्ये भारतातील जुने दस्ताऐवज आणि कलाकृती यांचाही या लिलावात समावेश आहे. हा लिलाव २१ मे ला इंग्लिश मिडलैं येथील लुडलो रेसकोर्समध्ये पार पडणार आहे.
First Published: Saturday, May 11, 2013, 16:02