Last Updated: Sunday, January 27, 2013, 16:11
www.24taas.com, सिडनीअखिल ऑस्ट्रेलिया मराठी साहित्य संमेलन सिडनी इथं २९ ते ३१ मार्चदरम्यान होणार आहे. या संमेलनाच्या निमित्तानं ऑस्ट्रेलियातल्या मराठीजनांनी एक स्वागतगीत तयार केलं आहे..
हार्बर ब्रिज, ऑपेरा हाऊस यांच्या बॅकग्राऊंडवर खास मराठमोळ्या वेशात हे गीत तयार झालं आहे... भारतीय वंशाच्या लोकांवर हल्ल्यांच्या घटना ऑस्ट्रेलियात आधुनमधून घडत असतात... अशा वेळी ऑस्ट्रेलियन मराठी तरुण-तरुणींनी थेट नऊवारीत लावणी करून आणि जरीपटक्यात ठेका धरून महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे...
मराठी माणसानं ऑस्ट्रेलिया खंडात आपलं घट्ट पाऊल रोवल्याचं हे प्रतिक आहे. आणि ऑस्ट्रेलियातही आपल्या मराठीचा झेंडा डौलाने फडकत आहे.
First Published: Sunday, January 27, 2013, 00:17