Last Updated: Saturday, September 21, 2013, 09:38
ww.24taas.com, झी मीडिया, लंडनलंडनच्या हिथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळावर योगगुरू बाबा रामदेव यांना रोखण्यात आलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार बाब रामदेव यांची विमानतळावर सहा तास चौकशी झाली.
सुरूवातीला बाबा रामदेव यांची चौकशी इमिग्रेशन विभागाने केली. त्यानंतर कस्टम विभागाचे अधिका-यांनी त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. त्यांची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली.
ही चौकशी नेमकी कशा संदर्भात होती याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. बाब रामदेव यांच्या कडून देखील चौकशीबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, September 21, 2013, 07:54