जन्मलेलं बाळ होतं दारूच्या नशेत! baby born with alcohol in it`s blood

जन्मलेलं बाळ होतं दारूच्या नशेत!

जन्मलेलं बाळ होतं दारूच्या नशेत!
www.24taas.com, झी मीडिया, पोलंड

पोलंडमध्ये एका बाळाचा जन्म झाला, त्यावेळी ते चक्क नशेमध्ये होतं. कारण या बाळाच्या धमन्यांमध्ये रक्ताऐवजी दारू वाहात असल्याचं निदर्शनास आलं.

२४ वर्षीय गर्भवती महिलेने जेव्हा बाळाला जन्म दिला, तेव्हा ते बाळ नशेमध्ये होतं. त्याच्या शरीरात दारू असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. या बाळाच्या शरीरात ४.५ ग्रॅम अल्कोहोल असल्याचं समोर आलं. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अल्कोहोलमुळे बाळाच्या हृदयाचे ठोके मंद झाले होते. त्या बाळाला कुठलीही शुद्ध नव्हती.

या बाळाच्या आईने गर्भारपणात अत्यंतिक दारू सेवन केल्यामुळे तिच्या शरीरात दारूचं प्रामाण वाढलं होतं. ही दारू बाळाच्याही शरीरात गेली होती. त्यामुळे बाळाची प्रकती नाजून आहे. या बाळाला सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, June 13, 2013, 18:23


comments powered by Disqus