Last Updated: Wednesday, June 12, 2013, 15:54
www.24taas.com, झी मीडिया, बर्लिनजर्मनीमध्ये एका बॅक कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे बँकेला मोठीच किंमत मोजावी लागली. बँक कर्मचाऱ्याला काम करता करता डुलकी लागली. आणि की-बोर्डवरच तो कर्मचारी झोपी गेला. त्यामुळे की- बोर्डवरील काही बटनं चुकून दाबली गेली आणि सुमारे ३० कोटी डॉलर्सची अमाउंट दुसऱ्याच अकाउंट ट्रान्सफर झाली.
ही चूक कुणाच्याच लक्षात न आल्याचा परिणाम म्हणून महिला सुपरवायजरला कामावरून काढून टाकण्यात आलं. कोर्टानेच नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय दिला. बँकेतील लिपिक ६४.२० युरोची रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करत असताना त्याला डुलकी लागली आणि तो काही वेळ की बोर्डवरच डोकं टेकून झोपला. त्यामुळे कीबोर्डचा २ हा अंक अनेक वेळा दाबला जात 222222222.22 यूरो असे अंक दाबले जाऊन २९.३ कोटी डॉलर्सची रक्कम हस्तांतरित झाली.
संबंधित लिपिकाच्या चुकीची दखल सुपरवायजरने घेणं आवश्यक होतं. मात्र तिच्याही ही चूक लक्षात आली नाही. ही चूक सुपरवायजरची मानून जजने या सुपरवायजरला नोकरीवरून काढून टाकण्याची शिक्षा सुनावली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, June 12, 2013, 15:50