ओबामांची व्हाइट हाउसमध्ये रंगली इफ्तार पार्टी , Barack Obama celebrating Ramadan in White House

ओबामांची व्हाइट हाउसमध्ये रंगली इफ्तार पार्टी

ओबामांची व्हाइट हाउसमध्ये रंगली इफ्तार पार्टी
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये इफ्तार पार्टी आयोजित केली होती. निमित्त होते ते रमजानचे. यावेळी खास पाहुण्यांचे स्वागत ओबामा यांनी केले.

अमेरिकेतील मुस्लिम नागरिकांनी देश उभारणीसाठी मोठे योगदान दिले आहे. तसेच इस्लामने अमेरिकेचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात हातभार लावला आहे. त्यासाठी त्यांचे हे कौतुक केले आहे, असे बराक ओबामा यांनी सांगितले.

याआधी ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली होती. आता त्यांनी इफ्तार पार्टी साजरी करून जगाला नविन संदेश दिलाय. अमेरिकेच्या जगभरातील मुस्लिम समुदायासोबत असलेल्या संवादामध्ये आर्थिक संधी आणि उद्योजकतेला पाठिंबा देणे हा मुख्य भाग असल्याचे यावेळी ओबामा यांनी म्हटले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, July 27, 2013, 10:25


comments powered by Disqus