Last Updated: Wednesday, September 26, 2012, 16:12
www.24taas.com, इस्लामाबादबिलवाल आणि हिना यांच्या प्रेमकहाणीत नवे रंग भरण्यास सुरूवात झाली आहे. इतके दिवस ज्या प्रेम कहाणीबद्दल लोक चोरून बोलत होते, त्याबद्दल आता पेपरमध्येही जाहीरपणे छापून येऊ लागलं आहे.
बिलावल हिनापेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे.तसंच हिना रब्बानी विवाहित असून त्यांना दोन मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रेमकहाणीमुळे हिना रब्बानींचे ‘मियाँ’ भलतेच संतापले आहेत.
जाहीरपणे या गोष्टीबद्दल जरी कुणी वाच्यता करायला तयार नसलं, तरी हिनाचा पती फिरोझ गुलज़ार याने मात्र हिनावर पाळत ठेवण्यास सुरूवात केली आहे. यासाठी त्याने ‘फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ला हिनाच्या बाबतीतील सगळी इत्थ्यंभूत माहिती मागवली आहे. यात हिना रब्बानीचे फोन कॉल्सचे डिटेल्सही मागवले आहेत. कारण यातील दोन नंबर्सबद्दल त्याच्या मनात संशय आहे.
First Published: Wednesday, September 26, 2012, 16:12