आठ वर्षाचा बॉडीबिल्डर बनला स्टार! brandon buzzing on internet after medrano shared his pic on faceb

आठ वर्षाचा बॉडीबिल्डर बनला स्टार!

आठ वर्षाचा बॉडीबिल्डर बनला स्टार!

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई

आठ वर्षाच्या बॉडीबिल्डरचे फेसबुकवरील पाच हजार पेक्षाही जास्त चाहत्यांनी ऑनलाईन फोटो शेअर केलेत. ब्रॅडन ब्लेक असं या मुलाचं नाव असून, तो आयर्लंड इथला रहिवाशी आहे.

स्टार बॉडीबिल्डर फ्रॅक मेड्रॉनोनं फेसबुकवर ब्रॅडनचा फोटो शेअर केले आणि त्यानंतर फेसबुकवर ते फोटो वायरल झालेत. मेड्रॉनो याला ब्रॅडनचा फोटो फेसबुकवर दिसला. ज्या स्टाईलमध्ये मेड्रॉनोचे काही फोटो इंटरनेटवर आहेत, अगदी तशाच पोजमध्ये ब्रॅडनचे फोटो आहेत. त्यामुळं मेड्रॉनो अधिकच खूश झाला.

अवघं २५ किलो वजनाचा ब्रॅडन जिम्नास्टिकचा चाहता आहे. तो नियमितपणे व्यायम आणि संतुलित आहार घेतो. ब्रॅडनचे वडील फुटबॉल खेळाडू आहेत. त्यामुळे फिटनेसचा वारसा घरातूनच त्याला मिळालाय. मात्र ब्रॅडनला बॉडिबिल्डंगची आवड आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 2, 2014, 11:51


comments powered by Disqus