Last Updated: Tuesday, November 20, 2012, 22:19
www.24taas.com, लंडन तालिबान्यांच्या विरुद्ध देशाच्या संघर्षाचं प्रतीक बनलेली पाकिस्तानी युवती मलाला युसूफजई हिला साहसी वृत्ती तसंच तिनं स्वातच्या खोऱ्यात प्रतिकूल परिस्थिती असतानाही महिलांच्या शिक्षणाला दिलेल्या प्रोत्साहनासाठी शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.
मलाला हिला हा शौर्य पुरस्कार ‘वर्ल्ड पीस अॅन्ड प्रॉस्पेरिटी फाऊंडेश’चे अध्यक्ष प्रिन्स अली खान यांच्या हस्ते देण्यात आला. मलाला हिच्यावतीन हा पुरस्कार ब्रिटेनमधल्या पाकिस्तानच्या उपउच्चायुक्त एस. झुल्फिकार गरदेजी यांनी स्वीकारला.
‘हा पुरस्कार मलाला किंवा तिच्या कुटुंबियांनी स्वीकारायला हवा होता. पण, सध्या ते अनुपस्थित असल्यामुळे त्यांच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारलाय’ असं यावे गरदेजी यांनी म्हटलंय. तालिबानच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली मलाला सध्या ब्रिटनच्या एका हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे.
‘वर्ल्ड पीस अॅन्ड प्रॉस्पेरिटी फाऊंडेश’चे अध्यक्ष प्रिन्स अली खान यांच्या म्हणण्यानुसार या पुरस्काराचा उद्देश विश्वात शांती आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्याचा आहे. विभिन्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारानं सन्मानित केलं जातं.
First Published: Tuesday, November 20, 2012, 22:19