ही आहे जगातील सर्वात उंच वधूbrazils tallest teen is set to become the worlds loftiest bride

ही आहे जगातील सर्वात उंच वधू

ही आहे जगातील सर्वात उंच वधू
www.24taas.com, झी मीडिया, ब्राझिलिया

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. असाच एक प्रत्यय आलाय. चक्क आपल्यापेक्षा एक फुटाने जास्त असलेल्या मुलीशी एक तरुण लग्न करणार आहे. त्यांनेच तिला लग्नाची मागणी घातली. 18 वर्षांची तरुणीची उंची चक्क 6.8 फुट आहे. ती जगातील सर्वांत उंच वधू असणार आहे.

18 वर्षीय मुलगी एलिसैनी दा क्रुज सिल्वा हिची उंची आहे 6 फूट 8 इंच. तिच्यापेक्षा 1 फूट उंचीने लहान असलेल्या फ्रान्सिनाल्डो यांने तिला प्रपोज केलं. त्याआधी दोघं डेट करत होती. अखेर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. असेच दोघे समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले होते. त्यावेळी फ्रान्सिनाल्डो यांने तिला प्रपोज केलं आणि तिच्या बोटात रिंग घातली. ही प्रेमी जोडी आहे ब्राझीलमधील.

फ्रान्सिनाल्डो याची उंची 5 फूट 4 इंच आहे. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी वर्षभरापूर्वी ब्राझीलमधील सैलिनोपोलीस शहरात एक छोटेसे घर घेतले आहे. या घरात लवकच लहान मुलाचा आवाज ऐकायला मिळेल. एलिसैनीला मुल हवे आहे. आणि तोही मुलगा हवाय. त्यासाठी तिने तसे बोलूनही दाखविले आहे. मी गरोदर राहिली नाही तर मुलगा दत्तक घेणार आहे, असे ती सांगते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 7, 2014, 17:34


comments powered by Disqus