महिलेच्या डोक्यातून ४८ वर्षांनी गोळी काढली bullet found in woman head after 48 years

महिलेच्या डोक्यातून ४८ वर्षांनी गोळी काढली


www.24 taas.com, झी मीडिया, चीन

चीनमधील एका 62 वर्षाच्या महिलेच्या डोक्यातून सर्जरीच्या सहाय्याने गोळी काढण्यात आली. ही गोळी मागील ४८ वर्षांपासून या महिलेच्या डोक्यात होती.

मात्र याबाबत कोणतीही माहिती या महिलेला नव्हती. महिलेचे नामा झाओ असं आहे, नाकात आणि डोक्यात दुखू लागल्यानंतरही महिला एका डॉक्टरकडे जाऊन पोहोचली.

या महिलेच्या डोक्यात आणि नाकात मागील दहा वर्षापासून दुखत होतं. चायना मेडिकल युनिवर्सिटीच्या फर्स्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांना या महिलेच्या डोक्याच्या आत एक धातू मिळाला.

या महिलेच्या नाकातून 2.5 सेंटीमीटर लांब आणि 0.5 सेंटीमीटर व्यासाची गोळी मिळाली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.

First Published: Tuesday, March 18, 2014, 23:08


comments powered by Disqus