चोराला मिळाली अश्लिल टेप, लैंगिक शोषण करणारा गजाआड, burglar finds child sex abuse on tapes

चोराला मिळाली अश्लिल टेप, लैंगिक शोषण करणारा गजाआड

चोराला मिळाली अश्लिल टेप, लैंगिक शोषण करणारा गजाआड

www.24taas.com, झी मीडिया, जेन (स्पेन)
तुम्हांला वाटत असेल की जगातील सर्व गुन्हेगार एकसारखेच वागतात, तर ही बातमी वाचा तुमचे मत बदलेल. दक्षिण स्पेनच्या जेन शहरात एका चोराने लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका व्यक्तीला पडून दिले आहे. पण चोर स्वतः समोर आला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, एका चोराने एका घरातील जुना सुपर ८ कॅमेरा आणि काही टेपची चोरी केली. त्यानंतर त्याने टेप पाहिल्या. या टेपमध्ये एक व्यक्ती लहान मुलांचे लैगिक शोषण करताना त्याला दिसला. चोराने या तिन्ही टेप एका पाकिटात टाकल्या आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका गाडीत टाकून तो निसटला. त्यानंतर एका पब्लिक फोनवरून पोलिसांना त्या पाकिटांची माहिती दिली. पाकिटात एक चिठ्ठी मिळाली, त्यात चोरी केलेल्या घऱाचा पत्ता होता.

या चोराने त्या चिठ्ठीत लिहिले की, दुर्दैवाने या टेप माझ्या हाती लागल्या मी तुमच्याकडे सुपूर्द करीत आहे. या आधारे तुम्ही तुमचे काम कराल आणि त्या घृणास्पद कृत्य करणाऱ्या माणसाला कायमचे गजाआड करू शकाल. सीएनएनच्या वेबसाइटवर दिलेल्या वृत्तानुसार स्पेनच्या पोलिसांनी गुरूवारी चोरांच्या सांगण्यावरून लैगिक छळ करणाऱ्या त्या व्यक्तीला अटक केली. त्या व्यक्तीचे वय ६४ वर्षे आहे.

आरोपी स्थानिक फुटबॉल कोच आहे. तो एकटा राहत होता. युवा खेळाडूंना अश्लिल व्हिडिओ दाखवून त्यांचे लैगिक शोषण करत असते. पोलिसांनी चार पीडित मुलांचीही ओळख पडटवली आहे. यात एक १६ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या मुलावर गेल्या ६ वर्षांपासून लैगिक अत्याचार होत होते. लैंगिक विकृतीने ग्रासलेल्या त्या आरोपीने चोरीची तक्रार दाखल केली होती. पण त्याने चोरीच्या तक्रारीत कॅमेरा आणि टेपची माहिती दिली नव्हती.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 23, 2013, 16:24


comments powered by Disqus